E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
रोहितच्या जागी बुमराला कसोटी कर्णधार करावे : मदनलाल
Wrutuja pandharpure
09 May 2025
मुंबई
: भारताचा क्रिकेटर रोहित शर्मा याने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. याआधी त्याने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यावर त्याने क्रिकेटच्या छोट्या प्रारुपातून थांबण्याचा निर्णय घेतला होता. आता तो फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसेल. इंग्लंड दौर्याआधी रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केल्यावर भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार कोण? हा मुद्दा आता चर्चेत आला. यासंदर्भात वर्ल्ड कप विजेत्या माजी क्रिकेटरने आपले मत व्यक्त केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाला १९८३ चा वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे दिग्गज क्रिकेटर मदन लाल यांनी भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाच्या भूमिकेसाठी जसप्रीत बुमराहचा विचार करायला हवा, असे म्हटले आहे.
भारतीय कसोटी संघाच्या नव्या नेतृत्वासंदर्भातील प्रश्नावर एएनआयशी संवाद साधताना मदन लाल म्हणाले आहेत की, जसप्रीत बुमराहला नेतृत्वाची संधी मिळायला हवी. तो खूप चांगली कामगिरी करत आहे. भारतीय संघातील तो कायमचा सदस्य आहे. संघातील अन्य काही युवा खेळाडूही आहेत. ज्यांच्यावर उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवता येईल.
२०२२ ते २०२५ या कालावधीत बुमराहनं भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या कॅप्टन्सीत भारतीय संघाने एक विजय मिळवला असून २ सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली तो उप कर्णधार होता. त्यामुळेच अन्य पर्यायाचा विचार करण्याआधी तोच कर्णधारपदाचा दावेदार ठरतो. पण बीसीसीआय शुबमन गिलचा विचार करत असल्याची चर्चा आहे.
जसप्रीत बुमराहने २०२२ मध्ये रोहितच्या अनुपस्थितीत इंग्लंड दौर्यावर पहिल्यांदा भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले होते. या सामन्यात भारतीय संघाला ७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. २०२४-२५ च्या हंगामातील ऑस्ट्रेलिया दौर्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत पर्थ कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. या सामन्यात भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवला होता. जसप्रीत बुमराची कामगिरीही लक्षवेधी राहिली होती. याच मालिकेतील सिडनी कसोटीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
Related
Articles
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
मंडई मेट्रो स्थानक परिसरात हत्या
06 Jun 2025
चित्रपटावरील बंदीविरोधात कमल हसन न्यायालयात
02 Jun 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
मंडई मेट्रो स्थानक परिसरात हत्या
06 Jun 2025
चित्रपटावरील बंदीविरोधात कमल हसन न्यायालयात
02 Jun 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
मंडई मेट्रो स्थानक परिसरात हत्या
06 Jun 2025
चित्रपटावरील बंदीविरोधात कमल हसन न्यायालयात
02 Jun 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
मंडई मेट्रो स्थानक परिसरात हत्या
06 Jun 2025
चित्रपटावरील बंदीविरोधात कमल हसन न्यायालयात
02 Jun 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर